पुणे : चांदणी चौकात ऍसिडगळती; वाहतूक वळवली

राजेंद्रकृष्ण कापसे
गुरुवार, 28 मे 2020

- ऍसिड गळतीमुळे पश्चिम बाह्यवळण महामार्गावरील वाहतूक शहराच्या मध्यभागातून वळविली

वारजे माळवाडी : पश्चिम बाह्यवळण महामार्गावरील चांदणी चौकात टँकरमधून ऍसिडची गळती होत असल्यामुळे मुंबईहून सातारा दिशेला जाणारी वाहतूक शहराच्या मध्यवर्ती भागातून रात्री उशिरा वळविण्यात आली. तर साताऱ्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक महामार्गांने सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे व सहायक पोलिस आयुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी चांदनी चौक याठिकाणी भेट दिली. वाहतूक वळविण्याचा निर्णय घेतला. पुणे शहर पोलिस व वाहतूक पोलिसांनी याचे नियोजन केले आले. शहराच्या मध्यवर्ती भागातून वळवावी लागली आहे. ही वाहतूक बालेवाडी येथील राधा चौकातून, विद्यापीठ चौक मार्गे थेट शिवाजीनगर, स्वारगेट, सातारा रस्ता जुन्या बोगद्यातून साताऱ्याकडे जाणार आहे. हायवेची वाहने असल्याने ही वाहने मोठी व जड वाहतूक करणारी असतात म्हणून त्यांना शहरातील मुख्य रस्त्याने वाहतूक वळविली आहे. अशी माहिती वारजे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याचबरोबर पुण्यातील रस्ता माहिती आहे. अशी वाहने राधा चौक, पुणे विद्यापीठ, नळ स्टॉप, पौड फाटा, कोथरूड कर्वेनगर वारजे मार्गे पुन्हा पश्चिम बाह्यवळण महामार्गाने वाहने जाऊ शकतात. 
पश्चिम बाह्यवळण महामार्गावरील चांदणी चौकात बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पनवेलहून नीरा या गावाच्या दिशेने (ता. पुरंदर) टँकर जात होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुंबईहून चांदणी चौकात आल्यावर कोथरूडला रस्ता जातो. त्या कैचीच्या ठिकाणी टँकर जात होता त्यावेळी टँकरमधून ऍसिडची गळती  जात असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे तो गाडीतून उतरून खाली उतरला पाहिले असता त्याने ही माहिती स्थानिक पोलिसांना दिली. अग्निशमन दलाचे यंत्रणा तेथे पोचली.

दरम्यान, ऍसिड रस्त्यावर गळती होत होते. त्यावरून वाहने जात असल्याने ते पूर्ण रस्त्याने पसरत जात होते. ते ऍसिड स्प्रेड झाले. आणि त्याचा वास उग्र येऊ लागला. त्यामुळे दुर्गंधी जास्त वाढत होती. परिणामी नागरिकांना डोळे चरचरणें, घशात खवखवणे, फुफ्फुसे मध्ये त्याचे वास पोचल्याने खोकला व थोडे श्वास घेण्यास नागरिकांना त्रास होत होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे महापालिकेच्या कोथरूड अग्निशमन दलाचे पथक या ठिकाणी कार्यरत आहे. त्यांनी तातडीने एका जेसीबीच्या साह्याने खड्डा खोदला. रस्त्याने वाहणारे ऍसिड त्या खड्ड्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे स्प्रेड होण्याचे प्रमाण कमी झाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खड्डा खोदून त्यात ते जमा केल्यामुळे ते एका ठिकाणी साठून राहील त्यात स्प्रेड होण्याचे थांबेल आणि अशा पद्धतीने अग्निशमन दलाने तेथील परिस्थिती त्यांनी हाताळलेली आहे. दरम्यान संबंधित कंपनीला संपर्क साधला आहे. त्यांचा टँकर आणि पंप असलेले वाहन पनवेल येथून चांदनी चौकाच्या दिशेने निघाली असल्याची माहिती कोथरूड अग्निशामक दलाचे केंद्रप्रमुख गजानन पात्रुडकर यांनी सकाळ'शी बोलताना दिली. 

शहरातील 24 किलोमीटरचा रस्ता

मुंबईहून साताऱ्याकडे जाणारी ही वाहतूक बालेवाडी येथील राधा चौकातून, बाणेर, विद्यापीठ चौक मार्गे थेट शिवाजीनगर, स्वारगेट, सातारा रस्ता जुन्या बोगद्यातून साताऱ्याकडे जाणार आहे. बालेवाडी ते कात्रज चौक असा शहरातील 24- 25 किलोमीटरचा मार्ग शहराच्या मध्यवर्ती भागातून जात आहे. 

18 किलोमीटरचा रस्ता

लहान वाहने राधा चौक, पुणे विद्यापीठ, नळ स्टॉप, पौड फाटा, कोथरूड कर्वेनगर वारजे मार्गे पुन्हा पश्चिम बाह्यवळण महामार्गाने वाहने जाऊ शकतात. असा 18 किलोमीटरचा रस्ता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Acid Leaked in Chandani Chowk Pune