

"आता दांडी मारणं महागात पडणार!" भोर, मुळशी आणि राजगडातील कर्मचाऱ्यांवर बायोमेट्रिकची नजर; आमदारांचा थेट प्रशासनाला 'अल्टिमेटम'.
Sakal
वेल्हे : भोर ,राजगड ,मुळशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवर आमदार शंकर मांडेकर यांनी मागील काही महिन्यांमध्ये भेट दिल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती बाबत सुधारणा होत नसल्याचे दिसून आल्यानंतर मांडेकर हे ॲक्शन मोडवर आले असून फक्त आरोग्य विभाग नव्हे तर पंचायतराज व्यवस्थेमध्ये पंचायत समिती हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी या विभागाची महत्त्वाची भूमिका असल्याचे मत व्यक्त करत मांडेकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भोर विधानसभा मतदार संघातील तीनही तालुक्यातील पंचायत समित्यांमध्ये बायोमेट्रिक हजेरी पद्धत लागू करण्याचे पत्र बुधवार (ता.15) रोजी दिले आहे.