पुणे - शहरातील अनेक इमारतींचे फ्रंट व साईड मार्जिन मध्ये हॉटेल थाटले असल्यामुळे अतिक्रमण तर होतच आहे पण पार्किंगचा प्रश्न देखील गंभीर होत आहे त्यामुळे अशाच मिळकतींवर कारवाई करा त्यांच्याकडून तीन पटकर वसूल करा असे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी दिले आहेत.
तसेच दर महिन्याला किमान १०० मिळकती शोधून त्यांना कर लावून त्यांची वसुली सुरू करणे, वापरातील बदलांची नोंद, व्यावसायिक वापरास आलेल्या जागांची तपासणी व थकबाकीदारांकडून कर वसुली करण्याचे आदेश दिले आहेत.