
पुणे : कोंढव्यातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने बुधवारी कारवाईचा बडगा उगारला. महापालिकेच्या बांधकाम विभागाने ३ हजार ८०० चौरस फूट बांधकाम जमीनदोस्त केले.
कोंढवा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागास मिळाली होती. त्यानुसार, बांधकाम विभागाकडून कोंढवा परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येत होती. बांधकाम विभागाकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करणे यासाठी ४० अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.