esakal | झाडांना खिळे ठोकणाऱ्यांवर कारवाई करा’
sakal

बोलून बातमी शोधा

pune

झाडांना खिळे ठोकणाऱ्यांवर कारवाई करा’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोथरूड : विविध प्रकारच्या जाहिराती करण्यासाठी रस्त्याकडेला असलेल्या झाडांना खिळे ठोकून प्रसिध्दी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. खिळे ठोकल्याने झाडांचे आयुष्य कमी होते. त्यामुळे झाडांवर खिळे ठोकणाऱ्यांवर कारवाई करावी, असा आग्रह वृक्षप्रेमी करत आहेत. दिवा प्रतिष्ठानच्यावतीने रामबाग कॉलनी परिसरात झाडावर खिळे ठोकून लावलेले दोनशे जाहिरात फलक काढण्यात आले. अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांनी कोथरूड क्षेत्रिय कार्यालय व कोथरूड पोलिसांकडे तक्रार करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.

एमआयटी कॉलेज रस्त्यावर टाटा स्काय यांनी ‘वुई आर नाऊ हिअर’ अशा आशयाचा मजकूर लिहिलेले फलक लावले होते. जाहिरात व फलक नियंत्रण नियमाअन्वये संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, असे पत्र कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त सचिन तामखडे यांनी कोथरूड पोलिसांना दिले आहे.

रामबाग कॉलनी परिसरात अनेक झाडांवर खिळे ठोकून जाहिरातीचे बोर्ड लावले आहेत. अनधिकृत फलक, फ्लेक्सवर कारवाई होत नसल्याने निरुपयोगी ठरलेला आकाशचिन्ह परवाना विभाग बरखास्त करावा, अशी उपरोधिक मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. तरीसुद्धा या विभागात सुधारणा झालेली दिसत नसल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.

loading image
go to top