

"प्रशासनाचा 'बाणा' आणि नेत्यांची 'अरेरावी'!" लोहगावात धूळ ओकणारा प्लांट अखेर जमीनदोस्त; सुरक्षा रक्षकांनी नेत्यालाच शिकवला धडा.
Sakal
पुणे : लोहगाव येथील बेकायदेशीर आरएमसी प्लांवर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर नगरसेविकेच्या पतीने अंगावर धावून जाऊन गोंधळ घातला. महापालिकेकडील महारष्ट्र सुरक्षा दलाच्या पोलिसांनी नगरसेविकेच्या पतीला पकडून पोलिस ठाण्यात नेल्यानंतर पुढील कारवाई झाली. त्यात आरएमसी प्लांट जमीनदोस्त करण्यात आला आहे.