वाघोलीमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर 'एवढ्या' जणांवर दंडात्मक कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

वाघोली व परिसरामध्ये मास्क न वापरणाऱ्या 19 जणांवर ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. मास्क न घालणाऱ्या व्यक्तींकडून १०० रुपये दंड आकारावा असे आदेश हवेलीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

वाघोली (पुणे) : वाघोली व परिसरामध्ये मास्क न वापरणाऱ्या 19 जणांवर ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. मास्क न घालणाऱ्या व्यक्तींकडून १०० रुपये दंड आकारावा असे आदेश हवेलीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार 19 जणांना प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे यासाठी वाघोली ग्रामपंचायतीचे कर्मचारी व पदाधिकारी कार्यवाही करीत आहेत.

'शरद पवारांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून गोपीचंद पडळकर यांनी तात्काळ माफी मागावी'​

संमतीपत्र द्यावे लागणार 
कोरोना संबंधी उपाय योजना करण्यासंदर्भात हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांच्या आदेशानुसार वाघोलीतून कामानिमित्त बाहेरगावी ये-जा करणाऱ्या नागरिकांना संमतीपत्र प्रत्यक्ष स्वरूपात प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयात भरून द्यावे लागणार आहे. संमतीपत्र देण्यासाठी कोणतीही ऑनलाइन सुविधा नसून संमतीपत्रावर नागरिकांची सही असणार असल्याने प्रत्यक्ष फॉर्म (हार्ड कॉपी) भरून द्यावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर 500 रुपये तर दुकानात, कार्यालयात, भाजी विक्रेते यांच्याकडे आलेल्या ग्राहकानेही मास्क वापरणे बंधनकारक आहे. ते न वापरल्यास ग्राहकास 100 रुपये तर दुकानदारास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against those who do not wear masks in Wagholi