Vidhan Sabha 2019 : मतदारांना प्रलोभन दाखविणाऱ्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणुकीत मतदारांना कोणत्याही वस्तू अथवा पैशांचे आमिष दाखविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल; तसेच अशा प्रकारच्या घटना कोणाला आढळल्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले. 

विधानसभा 
पुणे - विधानसभा निवडणुकीत मतदारांना कोणत्याही वस्तू अथवा पैशांचे आमिष दाखविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल; तसेच अशा प्रकारच्या घटना कोणाला आढळल्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले. 

विधानसभा मतदारसंघातील मतदारांना कोणत्याही वस्तू, रोख रक्‍कम, बक्षीस देणे आणि आमिष दाखविणे; तसेच या बाबी स्वीकारणे कायद्यानुसार गुन्हा आहे. अशा घटना आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक प्रशासनाने दिला  आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी : संपर्क क्रमांक
  वडगाव शेरी, संजीव देशमुख - ९५९४६१२४४४
  शिवाजीनगर, अस्मिता मोरे - ८४१२०७७८९९
  कोथरूड, प्रकाश अहिरराव - ९४२२९३५१३०
  खडकवासला, सचिन बारवकर  - ९८२२८७३३३३
  पर्वती, भानुदास गायकवाड - ९६५७७०११८०
  हडपसर, भारत वाघमारे - ९८५०७९११११  
  पुणे कॅंटोन्मेंट, नीता सावंत - ९४२१११८४४६ 
  कसबा, संतोषकुमार देशमुख - ८२७५००६९४५  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against those who seduce voters