hospital checking
sakal
पुणे - पुणे परिमंडळातील शासकीय रुग्णालयांमध्ये वाढत्या तक्रारींनंतर अखेर आरोग्य विभागाने तपासणी केली आहे. विभागाने पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील १२ शासकीय रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. अचानक झालेल्या तपासणीत अनेक गंभीर त्रुटी आणि आरोग्यसेवेत झालेली ढिलाई स्पष्टपणे उघड झाली आहे.