सत्ताधारी आमदारावरच कोथरुडमध्ये कारवाई, कारण...    

सत्ताधारी आमदारावरच कोथरुडमध्ये कारवाई, कारण...    
Updated on

कोथरुड : मास्क वापरला नाही तर आपल्यावर कोण कारवाई करणार किंवा मास्क वापरायची आपल्याला काहीच गरज नाही या भ्रमात आता कोणी राहू नये. कारण कारवाई करणारे तुम्ही कोण आहात, कोणत्या पदावर आहात, वा कोणाचे नातेवाईक आहात म्हणून तुम्हाला सुट देतील या भ्रमात असाल तर तो विचार सोडा. कोथरुडमध्ये पोलिस व पुणे महानगरपालिकेच्या कर्मचा-यांकडून सुरु असलेल्या कारवाईत सत्ताधारी पक्षाच्या नांदेड येथील आमदारांवर मास्क वापरला नाही म्हणून कारवाई करण्यात आली. त्यामुळे समाजात योग्य संदेश गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

कोथरूड-बावधन क्षेत्रिय कार्यालयाचा आरोग्य विभाग व एरंडवणा पोलिस चौकीतील पोलिस उपनिरिक्षक नरेंद्र मुंडे यांच्या देखरेखीखाली सुरु असलेल्या संयुक्त कारवाईत सत्ताधारी काँग्रेसचे नांदेडचे आमदार अमरनाथ राजूरकर हे सापडले. आमदार असले म्हणून काय झाले. नियम हे सर्वांना सारखेच आहेत असे सांगत पोलिस व महानगरपालिकेच्या प्रशासनाने नियमाचा आधार घेत त्यांच्याकडून पाचशे रुपयांचे शुल्क वसूल केले.

पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी थुंकून अस्वच्छता करणाऱ्या व मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम सुरु केली आहे. कोथरुडमधील डहाणूकर काॅलनी भुयारी मार्ग कै. मोहनराव शिराळकर चौक, शास्त्री नगर पोलिस स्टेशन चौक, किनारा चौक, कर्वे पुतळा चौक, शिवाजी पुतळा चौक, पौड फाटा चौक, भेलके नगर चौक येथे झालेल्या कारवाईत मास्क न वापरणारास पाचशे रुपये व थुंकणारांकडून एक हजार रुपये वसूल करण्यात आले. गेल्या तीन दिवसात झालेल्या कारवाईत एक लाख शेहेचाळीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. यामध्ये मास्क न वापरणारे २८० व थुंकणा-या सहा नागरीक यांच्यावर कारवाई करण्यात आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप कदम, पोलीस निरिक्षक प्रतिभा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरिक्षक सचिन लोहकरे, गणेश साठे, प्रमोद चव्हाण, वैभव घटकांबळे, शिवाजी गायकवाड, रूपाली शेंडगे, पोलीस हवालदार ए. आर. अंधारे, विलास जोशी, एस. एस. लोखंडे, मनोज पवार, श्रावण शेवाळे, गणेश कंधारे, मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे,  लक्ष्मण सोनवणे,साईनाथ तेलंगी, अशोक कांबळे, विजय पाटील यांच्या पथका मार्फत बेशिस्त वागणारांवर ठिकठिकाणी कारवाई सुरु आहे. 

वैजीनाथ गायकवाड म्हणाले की, सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर दंडात्मक कारवाई झाल्याने लोकांपर्यंत योग्य संदेश गेला आहे. आम्हाला मास्कची गरज काय या भावनेतून मास्क न वापरता सार्वजनिक जागी जाणारांना, रस्त्यावर विनाकारण फिरणारांना यामुळे चाप बसेल अशी अपेक्षा आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोथरूड-बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप कदम म्हणाले, ''पोलिस व महानगरपालिका यांच्या सतत चालणा-या संयुक्त कारवाईमुळे नागरीकांमध्ये शिस्त लागेल. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. मास्क न वापरता बाहेर पडणारे, रस्त्यावर थुंकणारे, सोशल डिस्टन्स न पाळणारे बेशिस्त लोक यांच्यामुळे शहरात कोरोना वाढत आहे.''

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com