Pune Crime: पुणे विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई, वर्षभरात जप्त झाले कोट्यवधीचे सोने

पुणे विमानतळावर गेल्या १ मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी वाढली
Pune Crime: पुणे विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई, वर्षभरात जप्त झाले कोट्यवधीचे सोने

पुणे विमानतळावर गेल्या १ मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी वाढली आहे. पुणे विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या कारवाईत गेल्या १ वर्षात २ कोटी रुपयांपेक्षा जास्त सोने जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय विमानातून या वर्षात आत्तापर्यंत २९९१ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत १,५३,५४,८१७ रुपये इतकी आहे

तर देशातील म्हणजेच डोमेस्टिक विमानातून सीमा शुल्क विभागाच्या कारवाईत १५१० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे ज्याची किंमत ७५,१७,९०८ रुपये इतकी आहे.

मागील एका वर्षात सीमा शुल्क विभागाकडून एकूण २,२८,७२,७२५ रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. पुण्यातून दुबई तसेच देशातील इतर शहरांमध्ये ये जा करणारी हवाई वाहतूक देखील काही वर्षांपासून वाढली आहे. या देशांमध्ये सोने स्वस्त मिळत असल्यामुळे लोक सोनं तिकडून घेऊन येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com