Pune News : विश्रांतवाडी ते टिंगरेनगर रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Action on encroachment on Vishrantwadi to Tingrenagar road pune

Pune News : विश्रांतवाडी ते टिंगरेनगर रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई

विश्रांतवाडी : विश्रांतवाडी ते टिंगरे नगर रस्त्यावरील हॉटेल्स, दुकाने यांसमोरील अनाधिकृत पत्र्याचे शेड व इतर अनाधिकृत बांधकामावर पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभाग चारच्या वतीने कारवाई करण्यात आली.

सुमारे आठ हजार स्क्वेअर फुट अतिक्रमण काढण्यात आले. जी 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. विश्रांतवाडी चौकापासून एअरपोर्टकडे जाणाऱ्या दुकानांसमोरील अनधिकृत पत्र्याचे शेडवर दिवसभर कारवाई करण्यात आले.

यामध्ये प्रामुख्याने हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. तुलसी हॉटेल, जोशी वडेवाले, सृष्टी गार्डन, शारदा हॉटेल, गर्ग पेढी आदी दुकानासमोरील अतिक्रमण काढण्यात आले. याचबरोबर फाईव्ह नाईन चौकात रस्त्यामध्ये असलेली पानटपरी, पत्रा शेड यांचेवर कारवाई करण्यात आली.

यापुढेदेखील अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सदरची कारवाई उपअभियंता एकनाथ गाडेकर, कनिष्ठ अभियंता कश्यप वानखेडे, फारुख पटेल, सहायक पराग गोरे, अतिक्रमण विभागाचे पोलीस निरीक्षक राजू अडागळे, पोलीस गट, बिगारी गट यांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आली.