Pune : शेतमाल दुबार विक्री करणाऱ्यावर केली कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

undri

शेतमाल दुबार विक्री करणाऱ्यावर केली कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उंड्री : मांजरी उपबाजारमध्ये दुबार शेतमाल विक्री करणाऱ्यावर कारवाई करून २४० शेपूच्या पेंढ्या जप्त केल्या. शेपूची विक्री करून बाजार समितीच्या नियमानुसार पावती करण्यात आल्याची माहिती बाजारप्रमुख विजय घुले यांनी सांगितले.

घुले म्हणाले की, रणजित कोळे (मु.पो. रामदरा, लोणीकाळभोर, ता. हवेली) या शेतकऱ्याने बाजार सुरू होण्याअगोदरच अक्षय काळभोरला याला शेपू विकला होता. मात्र, चाणाक्ष रमेश उंद्रे, लालासाहेब जाधव, केतल घुले, रावसाहेब तावरे, कुलदीप पवार या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही. त्यांनी तातडीने कारवाई करून माल जप्त केला. दलालविरहित मांजरी उपबाजार असून, येथे थेट शेतकरी शेतमालाची विक्री करतो.

मात्र, काही व्यापारी थेट शेतकऱ्यांकडून माल घेऊन तोच दुबार विक्री करण्याचा प्रयत्न करता. वारंवार शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात असून, शेतकरी बाजार फुटण्याअगोदरच व्यापाऱ्यांना शेतमाल देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, बाजार समितीमधील अधिकारी-कर्मचारी अशा दुबार विक्रेत्यांवर लक्ष ठेवून असतात. त्यामुळे शेतमाल दुबार विक्री करणाऱ्यांवर आळा बसला आहे. शेतकऱ्यांनी बाजार परिसरात शेतकऱ्यांना शेतमाल विकून फसवणू करून घेऊ नये, असेही आवाहन त्यांनी केले.

loading image
go to top