वडगाव शेरी - प्रसिद्ध मराठी कलावंत आणि नृत्यांगना हिंदवी पाटील यांचे चहाचे दुकान अतिक्रमण कारवाईत हेतू पुरस्सर तोडण्यात आल्या विरोधात मनसे मैदानात उतरली आहे. शेजारच्या परप्रांतीय व्यवसायिकांना सोडून फक्त एकाच दुकानावर कारवाई (ता. १३) झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागाची ही कारवाई संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.