esakal | आंबेगाव खुर्दमधील पप्पू येनपूरे टोळीविरुद्ध "मोका" अंतर्गत कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

moka

आंबेगाव खुर्दमधील पप्पू येनपूरे टोळीविरुद्ध "मोका" अंतर्गत कारवाई

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : खुनाच्या प्रयत्नासह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे करणाऱ्या आंबेगाव खुर्द परिसरातील पप्पू येनपूरे टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली "मोका"ची ही 49 वी कारवाई आहे.

प्रवीण उर्फ पप्पू अनंता येनपुरे (वय 27), अजित अंकुश धनावडे (वय 24), अभिजीत नंदू बोराटे (वय 31, तिघेही रा.आंबेगाव खुर्द) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी निखिल पप्पू गायकवाड याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. येनपुरे व त्याच्या साथीदारानी 1 ऑगस्ट रोजी फिर्यादीस अडवून त्यास कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करीत लुबाडले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीस अटक केली होती.

हेही वाचा: जुन्नर नगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू

येनपूरे व त्याच्या साथीदाराविरुद्ध 2016 पासून शारीरिक व मालमत्ता विरोधी गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, येनपूरे याने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी टोळी तयार करून आरोपीनी संघटीतपणे खुनाचा प्रयत्न, जबरी लूट, मारहाण, दरोडा, दहशत निर्माण करणे या स्वरुपाचे गंभीर गुन्हे केले होते.

त्यामुळे त्यांच्याविरुद्ध "मोका" अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जग्गनाथ कळसकर यांनी पोलिस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्फत अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांच्याकडे पाठविला होता. त्यास शिंदे यांनी मंजूरी दिली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली "मोका" ची ही 49 वी कारवाई आहे.

loading image
go to top