मास्क न लावल्यास आता होणार 'ही' कारवाई

mask1.jpg
mask1.jpg

किरकटवाडी (पुणे) : सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावरून  जाताना मास्क न लावता आढळून आल्यास, किराणामाल, भाजीपाला किंवा इतर कोणत्याही दुकानात ग्राहकाने किंवा दुकान चालकाने, दुकानातील कामगारांनी मास्क लावलेला नसल्यास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिले आहेत. दुकानांमध्ये असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित दुकान पुढील सात दिवस सक्तीने सील करण्याचे आदेशही गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींना दिले आहेत.

मागील काही दिवसांपासून शहराला लागून असलेल्या हवेली तालुक्यातील गावांमध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाने वेळोवेळी आवाहन केले तरी नागरिक नियमांचे उल्लंघन करतात. लॉकडाउन शिथिल करण्यात आल्यानंतर नागरिकांमधील गांभीर्य कमी झाल्याचे दिसून येत आहे. परंतु त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढण्यास सुरवात झाली आहे. नागरिकांना आवाहन करून किंवा विनंती करून समजत नसल्याने प्रशासनाने आता दंडात्मक हत्यार उपसले आहे. मास्क न लावता आढळल्यास प्रतिव्यक्ती 100 रुपये दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 100 रुपये दंड, दुकान चालक किंवा दुकानातील कामगार मास्क न लावता आढळल्यास 500 रुपये दंड व पुढील 7 दिवस दुकान सील अशा प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे.  

 आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींवर सोपवण्यात आलेली आहे. निष्काळजीपणे फिरणाऱ्या व आजार पसरविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या नागरिकांवर ग्रामपंचायतींच्या माध्यमातून कारवाई होते की नाही? की प्रशासनाने काढलेले आदेश कागदावरच राहणार! हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com