

PNE26W48070
आयुष्यात प्रदर्शनापेक्षा आचरणाला महत्त्व द्या - साध्वी अक्षयश्रीजी म.सा.
माणूस बाह्य आनंद शोधत असतो; मात्र पर्युषण पर्व माणसाला बाह्य प्रदर्शनातून अंतर्मुख होण्याची आणि आत्मचिंतनाची दिशा देते. इतरांना चांगले वाटावे म्हणून जगण्यापेक्षा स्वतःला चांगले वाटेल असे आचरण ठेवा. जीवनात दिसण्यापेक्षा असणे महत्त्वाचे असून प्रदर्शनापेक्षा आचरणाला महत्त्व द्या, असा संदेश परमपूज्य अक्षयश्रीजी महाराज यांनी दिला. बलिदान चौक येथील जैन स्थानकात आयोजित अक्षय चातुर्मासात पर्युषण पर्वात त्या बोलत होत्या. संतवाणी आणि शास्त्रश्रवणातून स्वतःकडे पाहण्याची संधी साधली पाहिजे. बाह्य सुख-सुविधांपेक्षा अंतर्मनातील समाधान महत्त्वाचे आहे. लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्या आचरणातून आपल्याला समाधान मिळते का, याचा विचार करा. पर्युषण पर्व हीच अंतर्मुख होण्याची आणि जीवनाला योग्य दिशा देण्याची संधी आहे, असे अक्षयश्रीजी महाराज यांनी स्पष्ट केले.
----------------------------
PNE26W48071
श्रावक-साधूंच्या आचारात अहिंसाच झळाळते - मुनीश्री प्रशांतरत्न विजयजी
पर्युषण महापर्वाच्या प्रारंभीच जीवदया आणि अहिंसेचा संदेश देत मुनिश्री प्रशांत रत्न विजयजी यांनी प्रत्येक जीवाच्या जगण्याच्या अधिकाराची जाणीव करून दिली. मनुष्याप्रमाणेच लहान-मोठ्या प्रत्येक जीवाला आपले प्राण प्रिय असतात. त्यामुळे कोणत्याही जीवाला मारण्याचा किंवा त्रास देण्याचा अधिकार नसून सर्व जीवांना अभय देणे आणि त्यांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले. श्री आदेश्वर जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या चातुर्मासानिमित्त माहेश्वरी भवनात आयोजित प्रवचनास भाविकांची मोठी उपस्थिती होती. हृदयात करुणा, दया आणि मैत्रीभाव जागवून घराघरांत जीवदया व ‘जयणा’ धर्माचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, भक्ती, विशेष आंगी, संगीतमय भक्तीभावना आणि प्रतिक्रमणात भाविक तल्लीन झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.