दाभोलकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते एकत्र

प्रियांका तुपे
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी साने गुरुजी स्मारकात महाराष्ट्रभरातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शेकडो कार्यकर्ते, नागरिक व विद्यार्थी जमले आहेत. 

निळू फुले कला मंदिर दालनात लागलेल्या पुस्तकांच्या स्टॉल्सवर नागरिकांनी पुस्तके खरेदीसाठी गर्दी केली आहे. डॉ. दाभोळकरांची श्रद्धा- अंधश्रद्धा, विचार तर कराल, ठरलं डोळस व्हायचं, भ्रम आणि निरास, अंधश्रद्धा विनाशाय, विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी आणि अशी अनेक पुस्तकं इथे विक्रीसाठी उपलब्ध असून तरुण, विद्यार्थी ही पुस्तके मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. याशिवाय कॉ. गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता? हे पुस्तक व हमीद दलवाई तसेच इतरही सामाजिक, राजकीय विषयांवरील पुस्तकं लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. 

या स्टॉल्सवर पुस्तक खरेदी करणाऱ्या प्रणाली जाधव यांनी सांगितले, की अशा कार्यक्रमांमध्ये एरव्ही सहज न मिळणारी छोटी छोटी माहितीपर पुस्तके अगदी दहा-वीस रुपयांमध्ये मिळतात. मी आज इथल्या स्टॉल्सवरून काही पुस्तके घेतली आहेत. वैचारिक जडणघडणीसाठी पुस्तक हे महत्त्वाचे साधन आहे. आजची जी सामाजिक परिस्थिती आपण अनुभवतो आहोत, त्या परिस्थितीत पुस्तके-आपल्याला दिशा देतात.

Web Title: activists gathered across the state to greet Dabholkar