
पुणे : वटपौर्णिमेच्या दिवशी महात्मा फुले वाड्यातील वडाच्या झाडाच्या पूजेच्या विरोधात शांततामय पद्धतीने समतावादी संघटना आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी पूजेसाठी येणाऱ्या महिलांना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती देऊन त्यांची अंधश्रद्धा आणि कर्मकांडाविरोधात प्रबोधन करणारी पत्रके वाटण्यात आली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन केले.