पुणे - माळशेज घाट - भोरंडे उदंचन प्रकल्प शुक्रवारी (ता.२१) पर्यावरण विषयक जनसुनावणी

पुणे - माळशेज घाट - भोरंडे उदंचन प्रकल्प  शुक्रवारी (ता.२१) पर्यावरण विषयक जनसुनावणी
Published on

माळशेज घाट-भोरंडे उदंचन प्रकल्पाची शुक्रवारी जनसुनावणी
--
स्थानिकांचा प्रकल्पाला विरोध; जुन्नर, मुरबाडमध्ये गावागावांत आंदोलने
--

ॲग्रोवन वृत्तसेवा

पुणे : अदानी रिन्यूएबल एनर्जी फिफ्टी-टू लिमिटेड कंपनीच्या प्रस्तावित १५०० मेगावॉट क्षमतेच्या माळशेज घाट-भोरंडे उदंचन प्रकल्पासंदर्भातील पर्यावरणविषयक जनसुनावणी शुक्रवारी (ता. २१) होणार आहे. अजनावळे (ता. जुन्नर) येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत दुपारी १२ वाजता ही जनसुनावणी होईल. दरम्यान, पर्यावरणाची हानी होण्याची भीती व्यक्त करीत स्थानिक आदिवासी गावांनी प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. जुन्नर (जि. पुणे) आणि मुरबाड (जि. ठाणे) भागांत गावागावांत आंदोलने सुरू आहेत.

‘पर्यावरण आघात मूल्यांकन अधिसूचना, २००६’ अन्वये ही जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हादंडाधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी तथा पर्यावरणविषयक जनसुनावणी समितीच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी होणार आहे.

अहमदाबाद (गुजरात) येथील अदानी रिन्यूएबल एनर्जी फिफ्टी-टू लिमिटेड कंपनीने हा उदंचन प्रकल्प प्रस्तावित केला आहे. प्रकल्पाच्या पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणीची जाहिरात २२ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. नियोजित दिवशी आणि वेळेत जनसुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे यांनी दिली.
---
चौकट

प्रकल्पबाधित गावांची बैठक

जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी शुक्रवारी (ता. १४) अजनावळे येथे प्रकल्पबाधित गावांतील ग्रामस्थांची बैठक घेतली. या बैठकीत ग्रामस्थांनी प्रस्तावित प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला. पर्यावरणाची हानी करणारा हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kalyan Latur Expressway Project Details
Nardave project 6.83 crore rehabilitation aid
Villagers and tribal community members stage a road blockade and a symbolic ‘Donkey March’ at Madh in Junnar, protesting against the proposed Malshेज Ghat Bhorande pumped hydro power project.
Malshej Ghat traffic update
Marathi News Esakal
www.esakal.com