'सीरम'चे अदर पूनावाला यांना ऑनलाईन पद्धतीने एक कोटींचा गंडा; गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

serum CEO adar poonawalla

'सीरम'चे अदर पूनावाला यांना ऑनलाईन पद्धतीने एक कोटींचा गंडा; गुन्हा दाखल

पुणे - सीरम इन्स्टीट्युटचे इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांना ऑनलाईन पद्धतीने तब्बल एक कोटींची गंडा घातल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याचं सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: आमचे देवेंद्र फडणवीस हे हिंदूह्रद्यसम्राट; आमदार नितेश राणेंकडून उल्लेख

या महिन्याच्या ७ ते ८ सप्टेंबर दरम्यान ही फसवणूक झाल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत सीरम इन्स्टीट्यूटचे वित्तीय अधिकारी सागर कित्तूर यांनी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आदर पूनावाला यांच्या नंबरवरून बनावट ऍपच्या मदतीने व्हॉट्सऐप मॅसेज पाठवून विविध खात्यांमध्ये पैसे पाठविण्याचं सांगण्यात आलं. त्यानुसार तब्बल एक कोटी एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कंपनीचे सीईओ आदर पुनावाला यांनी तातडीने पैसे भरण्यास सांगितल्याचा मॅसेज आल्याची माहिती, सतीश देशपांडे यांनी कित्तूर यांना दिली आहे. देशपांडे हे कंपनीचे संचालक आहेत. त्यानंतर कित्तूर यांनी बनावट मॅसेजद्वारे आलेल्या बँक खात्यांवर एक कोटीहून अधिक रक्कम ट्रान्सफर केली.

हेही वाचा: आता राज्यात 'मुख्यमंत्री किसान योजना'; शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला १२ हजार रुपये

दरम्यान याबाबत कंपनीत चर्चा केल्यानंतर आदर पूनावाला यांनी अशाप्रकारे खात्यांमध्ये रक्कम भरण्यास सांगितल्याचा कोणताही मॅसेज केला नसल्याचं समोर आलं. त्यानंतर कित्तूर यांनी तातडीने बंडगार्डन पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Adar Poonawalla Online Fraud Serum Institute Of India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newsonline fraud