दौंडच्या पूर्व भागातील रस्ते विकासासाठी २४० कोटी मंजूर

दौंडच्या पूर्व भागातील रस्ते 
विकासासाठी २४० कोटी मंजूर
Published on

खुटबाव, ता. २४ : दौंड मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांच्या मजबुतीकरण व रुंदीकरणासाठी आशियाई विकास बँकेमार्फत (ADB) २४० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे जुलै २०२६च्या पुरवणी अर्थसंकल्पात या कामाला मंजुरी मिळाली.
या निधीतून मतदारसंघातील ३० किलोमीटर लांबीच्या जिल्हा मार्गांचे काम दोन टप्प्यांत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आलेगाव ते मलठण मार्गे राष्ट्रीय महामार्ग ९ला जोडणारा रस्ता, तर दुसऱ्या टप्प्यात मलठण ते भिगवण स्टेशन या मार्गाचे काम होईल. सध्या हे रस्ते अरुंद आणि खड्ड्यांमुळे खराब झाल्याने नागरिक व शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
या विकासकामामुळे आलेगाव, बोरीबेल, मलठण, राजेगाव आणि भिगवण ही गावे थेट पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाशी जोडली जातील. यामुळे शेतीमाल वाहतूक वेगवान होईल, तसेच शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी मोठ्या शहरांकडे जाणे सुलभ होणार आहे. या रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे परिसराच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे आमदार कुल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com