esakal | पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen Cylinder

पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यात दररोज ३२५ टन ऑक्सिजनची (Oxygen) मागणी आहे. त्यातच पुणे (Pune) जिल्ह्याव्यतिरिक्त बेल्लारी, जामनगर आणि रायगड येथून सुमारे ११५ टन ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णालयांना (Patients) पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा (Supply) सुरू झाला आहे. परिणामी, रूग्णांसह नातेवाइकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, प्रशासनाला दररोज मागणीएवढा ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागत आहे. (Adequate supply of oxygen in Pune district)

पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे काही दिवसांपासून रुग्णालये आणि रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ सुरू आहे. परंतु, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि त्यांच्या टिमचे नियोजन आणि अथक प्रयत्नांमुळे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मागणी आणि पुरवठ्यामधील तफावत कमी झाली असून ‘कट टू कट’ ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. त्यामुळे दररोज पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

Oxygen Supply

Oxygen Supply

प्रतिदिन नऊ टन ऑक्सिजनची बचत

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील जम्बो कोविड सेंटर आणि वायसीएम रूग्णालयाची पाहणी केली. त्यांना ऑक्सिजन बचतीबाबत उपाययोजनेच्या सूचना दिल्या. या दोन रुग्णालयांत दररोज ४५ टन ऑक्सिजनचा वापर केला जात होता. ते प्रमाण आता ३६ टनांवर आले आहे. ऑडिट केल्यामुळेच दररोज नऊ टन ऑक्सिजनची बचत होत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील इतर रुग्णालयांमध्येही ऑक्सिजन वापराचे ऑडिट करणार असून, ३० ते ४० टन ऑक्सिजनची बचत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image