Adhalrao Patil : आढळराव आज राष्ट्रवादीत ; उपमुख्यमंत्री अजित पवार, वळसे पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती

शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांसह मंचर (ता. आंबेगाव) येथे शिवगिरी मंगल कार्यालयात मंगळवारी (ता. २६) दुपारी साडेतीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
Adhalrao Patil
Adhalrao Patilsakal
Updated on

मंचर : शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सर्व प्रमुख कार्यकर्त्यांसह मंचर (ता. आंबेगाव) येथे शिवगिरी मंगल कार्यालयात मंगळवारी (ता. २६) दुपारी साडेतीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अतुल बेनके, आमदार चेतन तुपे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी दिली.

एकलहरे येथील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून आढळराव यांची उमेदवारी निश्चित आहे. उमेदवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. आढळराव हे खासदार नसतानाही गेली पाच वर्षे सतत जनतेत आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. पंधरा वर्षे खासदारकीचा त्यांना अनुभव आहे.

त्यांनाही अनेकदा संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या व वळसे पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे. त्यांच्या समवेत सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. तसेच, भाजपचे कार्यकर्तेही सोबत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. त्यांच्या विचाराचा उमेदवार खासदार म्हणून निवडून येण्यासाठी राष्ट्रवादी, भाजप व सर्व मित्र पक्ष एकजुटीने प्रचार यंत्रणा उभी करणार आहेत. आंबेगाव तालुक्यातून किमान एक लाखाचे मताधिक्य आढळराव यांना मिळेल, असा विश्वास आहे.’’

Adhalrao Patil
Adhalrao Patil: ठरलं! आढळराव पाटील 26 मार्चला राष्ट्रवादीत करणार प्रवेश; शिरुरमध्ये होणार थेट लढत

अरुण गिरे व रवींद्र करंजखेले यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले, ‘‘खासदार म्हणून निवडून आल्यानंतर लोकांना मदत करणे तर सोडाच, पण अनेक गावांचे तोंडही डॉ. कोल्हे यांनी पाहिले नाही. त्यांचा खासदार निधी खर्च न झाल्याने मागे गेला आहे. निमंत्रण देऊनही अनेक कार्यक्रमाला त्यांनी दांडी मारली आहे. मी शूटिंगमध्ये व्यस्त आहे, असा ते निरोप देत होते. येथील जनतेने त्यांना शूटिंगच्या कामासाठी पाठवले नव्हते. याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. आढळराव पाटील पाच वर्षे सतत मतदारसंघ, राज्य व केंद्र सरकार बरोेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेबर संपर्कात आहेत. त्यांनी अनेक कामे मार्गी लावली आहेत. त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी कार्यकर्ते जिवाचे रान करतील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Atul Benake, Dilip Walse Patil and Shivajirao Adhalrao Patil
Dilip Walse Patil releases Dr Ashokkumar Pagaria’s book.
National Sarpanch Sansad office-bearers Yogesh Patil, Prakash Mahale and Sachin Bangar felicitating Nirgudsar Sarpanch Ravindra Walse Patil following his appointment as Ambegaon taluka president.
Pune Nashik High Speed Railway Demand Gains Momentum As Dileep Walse Patil Leads All Party Road Block Protest In Ambegaon
Marathi News Esakal
www.esakal.com