Dr. Rajesh Deshmukh : आदिवासी कातकरी नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम राबविणार

खडकवासला व भोर-वेल्हा-मुळशी या दोन विधानसभा मतदारसंघांतील आदिवासी कातकरी नागरिकांची मतदार नोंदणी करुन घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार.
Adivasi Katkari Society
Adivasi Katkari Societysakal

सिंहगड - खडकवासला व भोर-वेल्हा-मुळशी या दोन विधानसभा मतदारसंघांतील आदिवासी कातकरी नागरिकांची मतदार नोंदणी करुन घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिली आहे.

शेकडो आदिवासी कातकरी नागरीक मतदानाच्या हक्कापासून वंचित असल्याबाबत सकाळ'ने जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्यानंतर तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.

समाजातील सर्व घटकांची मतदार नोंदणी करण्यासाठी शासनाकडून सध्या कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. फेरीवाले, तृतीय पंथीय, वीटभट्टी कामगार, ऊसतोड मजूर, भटक्या विमुक्त जाती-जमाती अशा सर्वांची मतदार नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे.

असे असताना खडकवासला, एनडीए दहा नंबर गेट, गोऱ्हे बुद्रुक,डोणजे, वरदाडे,आगळंबे, बहुली, कुरण खुर्द (वेल्हे) कोंढूर (मुळशी) व पानशेत परिसरातील डोंगराळ भागात राहणारे आदिवासी कातकरी समाजातील काही अपवाद वगळता शेकडो नागरिक मात्र मतदानाच्या हक्कापासून वंचित आहेत.

याबाबत सकाळ'ने जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर डॉ राजेश देशमुख यांनी या सर्व गावांमध्ये विशेष मोहीम राबवून अठरा वर्षांवरील सर्व नागरिकांची मतदार नोंदणी करुन घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

'आमच्यापैकी खुप थोड्या लोकांकडे मतदान कार्ड आहे. मतदार नोंदणी चालू असल्याची माहितीच आमच्या लोकांपर्यंत पोचत नाही. शिक्षण नसल्याने कोणाला काही कळतही नाही. आमच्या सर्व लोकांना मतदान कार्ड देण्यात यावे. मतदान कार्ड मिळाल्याशिवाय आमच्याकडे कोणी लक्ष देणार नाही. मत मागण्यासाठी तरी नेते वस्तीवर येतील.'

- नीरा वाघमारे, आदिवासी कातकरी महिला कार्यकर्त्या.

'आजच तातडीने सूचना देण्यात आल्या असून खडकवासला व भोर-वेल्हा-मुळशी या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील आदिवासी कातकरी नागरिकांची मतदार नोंदणी करुन घेण्यासाठी वस्त्यांवर जाऊन विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.'

- डॉ राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com