esakal | मुंबईहून जुन्नरमध्ये येताय? तर...
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईहून जुन्नरमध्ये येताय? तर...

मुंबईकरहो, तुम्ही आपली आणि गावाची काळजी घ्या, असे कळकळीचे आवाहन प्रशासनाने तालुक्यात आलेल्या मुंबईकरांना केले आहे.

मुंबईहून जुन्नरमध्ये येताय? तर...

sakal_logo
By
दत्ता म्हसकर

जुन्नर : मुंबईकरहो, तुम्ही आपली आणि गावाची काळजी घ्या, असे कळकळीचे आवाहन प्रशासनाने तालुक्यात आलेल्या मुंबईकरांना केले आहे. जुन्नर तालुक्याच्या विविध भागात 15 मेनंतर कोरोनाबाधित क्षेत्रातून आलेल्या मुंबईकरांची संख्या अधिक आहे. मुंबईहून आलेले किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने हे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या काही दिवसांत तालुक्यातील  कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८ वर पोचली आहे. यातील डिंगोरे येथील महिला रुग्ण दोन महिन्यांपूर्वी बरी झाली आहे. तर औरंगपूर येथील एका रुग्णाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या सावरगांव ५, धोलवड ३, मांजरवाडी, पारुंडे व आंबेगव्हाण येथे प्रत्येकी दोन तर खिलारवाडी व धालेवाडीतर्फे मिन्हेर येथे प्रत्येकी एक अशा 16 कोरोनाबाधित रुग्णांवर पुणे येथे उपचार सुरू आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुंबईहून गावी येणाऱ्या व आलेल्या नागरिकांनी गावातील आपल्या स्वतंत्र घरात किंवा शाळा, समाज मंदिर येथे स्वतःला विलगीकरण करून घ्यावे, या काळात कोठे बाहेर हिंडू नये. वैद्यकीय मदत हवी असल्यास जवळच्या सरकारी रुग्णालयात कळवावे. तुमची तपासणी जागेवर येऊन केली जाईल. पण औषध उपचारासाठी देखील गावात शहरात फिरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, गेल्या दोन आठवड्यात मुंबईहून सुमारे पंधरा हजार व्यक्ती तालुक्यात विविध गावात आल्या आहेत. त्या सर्वांनी घरी किंवा गावाने व्यवस्था केलेल्या ठिकाणी विलगीकरणातच राहून प्रशासनास सहकार्य करावे व कोरोना प्रादुर्भाव रोखण्यास मदत करावी, असे कळविण्यात आले आहे.

loading image