Pune University : विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास; ‘अभाविप’तर्फे आंदोलनाचा इशारा

विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री वीरेंद्र सिंग सोलंकी हे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सोलंकी हे पुणे विद्यापीठासह अन्य विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या भेटी घेणार आहेत.
ABVP
ABVPesakal

पुणे - ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, विद्यापीठांतर्गत दोन्ही उपकेंद्रांचे सक्षमीकरण करावे, परीक्षांचे निकाल वेळेत लावावेत, रखडलेली प्राध्यापक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, यांसह अन्य मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (पुणे महानगर) वतीने देण्यात आला आहे.

विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री वीरेंद्र सिंग सोलंकी हे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सोलंकी हे पुणे विद्यापीठासह अन्य विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या भेटी घेणार आहेत. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत सोलंकी यांच्यासह विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर मंत्री हर्षवर्धन हरपुडे, माध्यम संयोजक प्रतीक्षा लोहकरे आदी उपस्थित होते.

सोलंकी म्हणाले, ‘विद्यार्थी परिषदेचे छात्र नेता विविध राज्यातील विद्यापीठांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. आतापर्यंत आम्ही सर्व छात्र नेत्यांनी ३५० विद्यापीठांना भेटी दिल्या आहेत. उच्च शिक्षणातील वाढलेल्या ताणामुळे होणाऱ्या आत्महत्या, विद्यार्थिनींचे प्रश्न सर्वत्र हे प्रामुख्याने दिसत आहेत. पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात येत असून त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत.’

‘विद्यार्थी परिषदेतर्फे पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न प्रत्येक महाविद्यालयात जाऊन विद्यापीठासंदर्भात असलेल्या समस्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात निदर्शनास आलेल्या मुद्द्यांवर लवकरच ‘विराट छात्र मोर्चा’ काढण्यात येईल,’ असे हरपुडे यांनी सांगितले.

‘अभाविप’च्या प्रमुख मागण्या -

- विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची तत्काळ अंमलबजावणी व्हावी

- परीक्षांचे निकाल वेळेत लावावेत

- विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या परंतु शिक्षण न देणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी

- नवीन वसतिगृह उभारणीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू करावी

- विद्यापीठातील क्रीडांगण संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खुले करावे

- महाविद्यालयाकडून देण्यात येणारे अंतर्गत गुण पाठविण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता असावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com