esakal | पुणे जिल्ह्यातून परत आपल्या गावी जायचंय? मग हे वाचाच! 
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे जिल्ह्यातून परत आपल्या गावी जायचंय? मग हे वाचाच! 

जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक

- वैद्यकीय तपासणीनंतरच परवानगी

पुणे जिल्ह्यातून परत आपल्या गावी जायचंय? मग हे वाचाच! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, या कालावधीत बेघर, विस्थापित कामगार, परराज्यातील अडकलेले कामगार, पर्यटक, विद्यार्थी यांना त्यांच्या मूळगावी पाठविण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मंत्रालयाने आदेश काढले आहेत. या आदेशानुसार परराज्यातील स्थलांतरित कामगारांनाही त्यांच्या मूळ गावी जाण्याची इच्छा असल्यास त्यांना आपल्या मूळगावी परतता येणार आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शासनाने सदर आदेशामध्ये खालील निकष विचारात घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या कामगारांना आपल्या मूळ गावी परत जायचे आहे, अशा कामगारांनी आपली नावनोंदणी संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्या कार्यालयाकडे ई-मेल व दूरध्वनी संदेशाद्वारे करावी. तसेच जी लोकं अशा स्वरूपाचा प्रवास करणार आहेत, अशा लोकांची तपासणी केली जाईल. तसेच कोव्हिड-१९ ची लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच मूळ गावी जाण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वैद्यकीय तपासणीनंतरच परवानगी

पुणे जिल्ह्यातून इतरत्र म्हणजे त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येणाऱ्या कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल आणि त्यांच्यामध्ये कोव्हिड-१९ ची कोणतीही लक्षणे नसल्यास त्यांना मूळ गावी पाठविण्याबाबतची विनंती विचारात घेतली जाईल.

जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक

मूळ गावी पतरणाऱ्या कामगारांची संख्या व त्यांची ठिकाणे विचारात घेऊन वाहतूक आराखडा तयार करण्यात येईल. संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व राज्य प्रशासनाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर कामगारांना त्यांच्या मूळ गावाकडे रवाना करण्यात येईल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ई-मेलद्वारे करावी नावनोंदणी

सर्व स्थलांतरित कामगार, विद्यार्थी व पर्यटक यांना आवाहन करण्यात येते, की त्यांनी कोणतीही घाईगडबड न करता संबंधित तालुक्याच्या नियंत्रण कक्षाशी दूरध्वनीवरुन अथवा ई-मेलद्वारे आपली नाव नोंदणी करावी.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तालुका नियंत्रण कक्ष, संपर्क क्रमांक व ई-मेल आयडीची यादी खालीलप्रमाणे -

- तहसील कार्यालय हवेली – 020-24472348 – tahsildarhavelipune@gmail.com

- अपर तहसील पिंपरी चिंचवड – 020-27642233 – apartahsilpimparichinchwad@gmail.com

- तहसील कार्यालय पुणे शहर – 020-24472850 – tahasildarpunecity@gmail.com

- तहसील कार्यालय मावळ – 02114-235440 – tahsilmaval@gmail.com

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

- तहसील कार्यालय मुळशी – 020-22943121 – tehsilmulshi@gmail.com

- तहसील कार्यालय शिरुर – 02138-222147 – tahsilshirur@gmail.com

- तहसील कार्यालय भोर – 02113-224730 – tahsilbhor@gmail.com

- तहसील कार्यालय वेल्हा – 02130-221223 – tahsilvelhel@gmail.com

- तहसील कार्यालय पुरंदर – 02115-222331 – tahsildarpurandar@gmail.com

- तहसील कार्यालय जुन्नर – 02132-222047 – tahsil junnar@gmail.com

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

- तहसील कार्यालय आंबेगाव – 02133-244214 – tahasilambegaonp@gmail.com

- तहसील कार्यालय खेड – 02135-222040 – tahsilkhed@gmail.com

- तहसील कार्यालय दौड – 02117-262342 – tahsildaundl@gmail.com

- तहसील कार्यालय इंदापूर – 02111-223134 – indapur tahsil@gmail.com

- तहसील कार्यालय बारामती – 02112-224386 – tahsildarbmt@gmail.com

loading image
go to top