शिरोली बुद्रुक येथील बाल विवाह रोखण्यात प्रशासनाला यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाल विवाह

शिरोली बुद्रुक येथील बाल विवाह रोखण्यात प्रशासनाला यश

शिरोली बुद्रुक येथील बाल विवाह रोखण्यात प्रशासनाला यश

Administrative Officers Preventing Child Marriage Shiroli Budruk

बाल विवाह करणे तसेच संबधित बाल विवाहात सहभागी होणे बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार गुन्हा आहे.

जुन्नर : शिरोली बुद्रुक ता.जुन्नर येथे आज रविवार ता.२१ रोजी दुपारी १ वाजता होणारा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. शिरोली बुद्रुक येथील राहत्या घरी अल्पवयीन मुला-मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुका संरक्षण अधिकारी अक्षय साळुंके जुन्नर पोलीस व शिरोली बुद्रुकचे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामसेवक यांची मदत घेऊन तत्परतेने विवाहस्थळी जाऊन बालविवाह थांबविला. या विवाह सोहळ्यास ४०० हुन अधिक वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते.

यावेळी मुला-मुलीच्या आधारकार्डची पाहणी केली असता त्यावरील जन्मतारखेनुसार मुलीचे वय १६ वर्षे ८ महिने तर मुलाचे वय १६ वर्षे ७ महिने असल्याचे दिसून आले.मुला-मुलीचे आई-वडील व नातेवाईकांचे पोलीस ठाण्यात समुपदेशन करून कायद्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. मुलीचे १८ व मुलाचे २१ वर्षे वय पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा विवाह करणार नाही असा जबाब लिहून घेण्यात आला. हा बालविवाह रोखण्यासाठी जुन्नरचे पोलीस उपनिरीक्षक ए.एस.पाटील व कर्मचारी, तालुका स्तरीय संरक्षण अधिकारी अक्षय साळुंखे, ग्रामसेवक तसेच पोलीस पाटील यांचे सहकार्य झाले.

बाल विवाह करणे तसेच संबधित बाल विवाहात सहभागी होणे बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार गुन्हा आहे. बालविवाह झाल्यास या कायद्यात शिक्षेची तरतूद आहे. मंगल कार्यालय मालकांनी तसेच पालकांनी आधारकार्ड तसेच जन्मतारखेचा किंवा शाळा सोडल्याचा दाखला, शाळेतील जन्मनोंद या कागदपत्रांचा आधार घेऊन वयाची खात्री करावी. आपल्या आसपास बालविवाह होत असल्यास त्वरित चाईल्ड लाईन नंबर १०९८, पोलीस हेल्पलाईन नंबर १०० किंवा पोलीस अधिकारी किंवा महिला बाल विकास विभागास माहिती देऊन प्रशासनाची मदत करावी. अशी माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवली जाईल असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय पुणेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Administrative Officers Preventing Child Marriage Shiroli Budruk

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..