
पुणे : पुणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकारी प्रतिभा पाटील, आशा राऊत यांची आज नगर परिषद प्रशासन संचालनालयाने मुंबईत बदली केली. पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन, दक्षता, मालमत्ता व्यवस्थापन या विभागाची जबाबदारी होती. तर आशा राऊत यांच्याकडे शिक्षण विभाग, परिमंडळ तीनच्या उपायुक्त पदाची जबाबदारी होती.