अखेर वनविभागाचा 'हिरवा कंदील'! आपटी-खेतेपठार रस्त्याचा वनवास संपणार; जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा
sakal
घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील आपटी (खेतेपठार) या अतिदुर्गम भागाला जोडणाऱ्या ग्राममार्ग क्रमांक १४९ वरील रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी वनविभागाकडून परवानगी मिळाली आहे.अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.या निर्णयामुळे आंबेगाव व जुन्नर तालुक्यांच्या सीमेवरील नागरिकांच्या दळणवळणाच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.