

कात्रज-कोंढवा रस्ता मोकळा होणार! भूसंपादनासाठी २७६ कोटी जमा; ५० मीटर रुंदीकरणाचा मार्ग सुकर झाल्याने लाखो पुणेकरांना दिलासा
Sakal
पुणे : कात्रज कोंढवा रस्त्याच्या ५० मीटरच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेली ४१ हजार ५१७ चौरस मिटर इतकी जागा भूसंपादन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून, त्यासाठी महापालिकेने तब्बल २७६ कोटी रुपयांची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा केली आहे. या निर्णयामुळे पुढील एका महिन्यात ही संपूर्ण जागा महापालिकेच्या ताब्यात येणार आहे. त्याचा या भागातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.