डिप्लोमाला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो; ही महत्त्वाची बातमी नक्की वाचा!

Students_Admission
Students_Admission
Updated on

पुणे : दहावी आणि बारावीनंतरच्या तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाची यंदा एक प्रवेश फेरी कमी करण्यात आली असून दोनच नियमित फेऱ्या होणार आहेत. तर, केवळ महाराष्ट्रात इयत्ता १० वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळणार आहे. याबाबत तंत्रशिक्षण संचालनालयाने नवीन आदेश जाहीर केले आहेत. 

दहावीनंतर पाॅलिटेक्नीकला प्रवेश घेता येतो, तर इयत्ता बारावीनंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या शाखांच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. त्याचप्रमाणे द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठीही प्रवेश देण्यात येतात. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आणि प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयाने अद्याप जाहीर केले नसले प्रवेशासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. 

या अभ्यासक्रमासाठी इयत्ता ८वी, ९वी आणि १०वी हे शिक्षण महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्थेत होणे आवश्यक होते. पण आता बदललेल्या नियमानुसार ८वी, ९वी इतर राज्यात केले तरी १०वी महाराष्ट्रात झाली असेल, तर या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार आहे. 

दरवर्षी या सर्व अभ्यासक्रमाच्या तीन फेऱ्या होतात, पण यंदा दोनच प्रवेश फेऱ्या घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तिसरी प्रवेश फेरी रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवेश प्रक्रियेचा कालावधी कमी होणार आहे. अल्पसंख्याक महाविद्यालयांनाही दोन प्रवेश फेऱ्यांचा आदेश लागू होणार आहे. 

जे विद्यार्थी अर्ज भरू न शकलेले, प्रवेश न मिळालेले, न घेतलेले अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी घेतली जाणार आहे. दोन प्रवेश फेऱ्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश देण्यात येतील. त्यात राज्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. त्यानंतरही जागा रिक्त राहिल्यास इतर राज्यातील विद्यार्थी आणि परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देता येतील. 

आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयानुसार यंदा या अभ्यासक्रमांसाठी मराठा प्रवर्गासाठी १६ ऐवजी १२ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील. यंदा अभ्यासक्रम किंवा संस्था बंद करण्यासाठी अर्ज केलेल्या संस्थांना यंदा प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असे आदेशात नमूद केले आहे. 

महत्त्वाचे मुद्दे :

- नियमात बदल केल्याने प्रवेश वाढण्याची शक्यता
- डिफेन्सच्या कोट्यासाठी ५ जागांऐवजी ५ टक्के जागा आरक्षित
- कागदपत्र तपासणीसाठी स्वतंत्र आदेश काढले जाणार
- महाराष्ट्रात ८वी, ९वी उत्तीर्ण न होता, थेट १०वीत प्रवेश घेणाऱ्यांना दिलासा

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune PMC may expand Education Committee powers
PMC’s DBT plan for sanitation equipment hits a roadblock
Socialist thinker Ratnakar Mahajan passes away in Pune.
Rahul Kul leads Vidarbha review on jobs and development.
Marathi News Esakal
www.esakal.com