सज्ञान मुलीला इच्छेविरुद्ध राहण्यास भाग पाडता येणार नाही

सज्ञान मुलीला इच्छेविरुद्ध 
राहण्यास भाग पाडता येणार नाही
Published on: 

प्रौढ मुलीला इच्छेविरुद्ध
राहण्यास भाग पाडता येणार नाही
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
प्रयागराज, ता. ६ (पीटीआय) : प्रौढ मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध पालकांसोबत राहण्यास भाग पाडण्यासाठी हेबियस कॉर्पस याचिका दाखल करता येणार नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
न्यायाधीश संदीप जैन यांनी २८ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशात, प्रौढ व्यक्तीने स्पष्टपणे इच्छा व्यक्त केल्यास, केवळ संबंधित व्यक्ती तिची पालक आहे या कारणावरून तिला एखाद्या विशिष्ट व्यक्तीसोबत राहण्यास भाग पाडता येणार नाही, असे नमूद केले.
कलावती देवी यांनी त्यांची २५ वर्षीय मुलगी पूजा हिला न्यायालयासमोर हजर करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. १७ ऑगस्ट २०२६ रोजी न्यायालयाने पूजाला हजर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. त्यानुसार पूजाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाशी झालेल्या संवादात पूजाने आपण स्वतःच्या इच्छेने दिल्लीत स्वतंत्रपणे राहत असल्याचे सांगितले. तसेच आपल्याला कोणत्याही बेकायदा पद्धतीने डांबून ठेवण्यात आलेले नाही, असे स्पष्ट केले. आईसोबत राहण्याची इच्छा नसल्याचेही तिने सांगितले. आईचे वर्तन आपल्याशी सौहार्दपूर्ण नसल्याचा तसेच वारंवार मारहाण आणि गैरवर्तनाला सामोरे जावे लागल्याचा आरोप तिने केला. मात्र, कलावती देवी यांनी हे आरोप फेटाळून लावत मुलीने आपल्यासोबतच राहावे, अशी इच्छा व्यक्त केली. पूजा सज्ञान असून तिने स्वेच्छेने आणि जाणीवपूर्वक आईसोबत राहण्याची अनिच्छा व्यक्त केली आहे, असे न्यायालयाने तिच्या जबाबावरून नमूद केले. त्यामुळे ती तिच्या पसंतीच्या ठिकाणी आणि तिच्या पसंतीच्या व्यक्तीसोबत राहण्यास स्वतंत्र आहे, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com