

FDA Crime
ESakal
पुणे - अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात मोठी कारवाई करत सात ठिकाणी छापे टाकून ३७ लाख ६१ हजार १०० रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला. या मोहिमेत भेसळीच्या संशयावरून दूध, पनीर, लस्सी, बिस्किटे यांसह इतर पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, मोठ्या प्रमाणावरील दूध नष्ट करण्यात आले आहे.