
माळेगाव : छत्रपतीच्या सभासदांनी अजित पवार यांच्या ताब्यात कारखाना दिला. त्यामुळे पवारांनी प्रथम त्या सभासदांना राज्यात उच्चांकी ऊस दर देवून न्याय द्यावा. त्यानंतर त्यांनी माळेगावच्या चेअरमन पदाची स्वप्न पहावीत. माळेगावचा सभासद सुज्ञ आहे. २२ हजार सभासदांपैकी एक माळेगावचा चेअरमन होणार आहे. आमचे नेते चंद्रराव तावरे व रंजन तावरे हेच ठरवणार माळेगावचा पुढील चेअरमन, असा विश्वास सहकार बचाव पॅनेलचे प्रमुख अॅड. शामराव कोकरे यांनी व्यक्त केला.