सागरी सुरक्षेसाठी 
हेलिकॉप्टरची होणार खरेदी

सागरी सुरक्षेसाठी हेलिकॉप्टरची होणार खरेदी

Published on

सागरी सुरक्षेसाठी
हेलिकॉप्टरची होणार खरेदी

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ३ ः सागरी सुरक्षा मजबूत करण्याच्या अनुषंगाने तटरक्षक दलासाठी सहा ॲडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर (एएलएच) तसेच क्षेपणास्त्रांची खरेदी केली जाणार असून यासंदर्भात पाच हजार ८३ कोटी रुपयांचे दोन करार करण्यात आल्याचे सूत्रांकडून मंगळवारी सांगण्यात आले. दुहेरी इंजिन असलेले अत्याधुनिक हेलिकॉप्टर लढाऊ युद्धनौका आणि समुद्रातील हवाई हद्दींजवळ तैनात केली जातील. तसेच जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहेत.
‘एएलएच एमके-टाईप तीन हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी दोन हजार ९०१ कोटी रुपये खर्च होणार आहेत. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून या हेलिकॉप्टर्सची खरेदी केली जाईल. सध्या सेवेत असलेल्या हेलिकॉप्टरच्या तुलनेत या हेलिकॉप्टरची ताकद आणि क्षमता जास्त आहे. दरम्यान, रशियाच्या ‘जेएससी रोसोबोर्नो’ एक्सपोर्ट कंपनीकडून जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने दोन हजार १८२ कोटी रुपयांचा करार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com