Pune News : पदपथावर जाहिरात फलक; पादचाऱ्यांनी चालायचे कुठून?; आकाशचिन्ह विभागाचे दुर्लक्ष, क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

पादचाऱ्यांच्या सुरक्षित आणि मोकळ्या ये-जा करण्यासाठी असलेल्या पदपथांवर व्यापारी, व्यावसायिकांचे जाहिरात फलक, वस्तूंची मांडणी आणि वाहनांचे अतिक्रमण वाढले आहे.
Advertisement Hoarding on Footpath in shivajinagar

Advertisement Hoarding on Footpath in shivajinagar

sakal

Updated on: 

शिवाजीनगर - पादचाऱ्यांच्या सुरक्षित आणि मोकळ्या ये-जा करण्यासाठी असलेल्या पदपथांवर व्यापारी, व्यावसायिकांचे जाहिरात फलक, वस्तूंची मांडणी आणि वाहनांचे अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याची वेळ येत असून, अपघाताचा धोकाही वाढला आहे. जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असताना पदपथांवरील अतिक्रमणांचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com