Pune Ring Road : रिंगरोडच्या मोजणीला बाधित शेतकरी व जागामालकांचा विरोध; आधी जागेचा आणि बांधकामाचा दर निश्चित करा, नंतरच मोजणी करा; नागरिकांची मागणी

पुणे महानगरपालिकेच्या ६५ मीटर इनर रिंगरोडच्या अनुषंगाने गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, जांभूळवाडी आणि आंबेगाव परिसरात प्रस्तावित रस्त्याच्या मोजणीला बाधित जागामालकांनी केला विरोध.
Pune Ring Road

Pune Ring Road

esakal

Updated on: 

कात्रज - पुणे महानगरपालिकेच्या ६५ मीटर इनर रिंगरोडच्या अनुषंगाने गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, जांभूळवाडी आणि आंबेगाव परिसरात प्रस्तावित रस्त्याच्या मोजणीला बाधित जागामालकांनी विरोध केला. मंगळवारी (ता. १७) सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे महापालिका, पीएमआरडीए आणि महसूल विभागाचे अधिकारी मोजणीसाठी संबंधित ठिकाणी उपस्थित झाले होते. मात्र, जागेचा आणि बांधकामाचा मोबदला निश्चित केल्याशिवाय मोजणी करू देणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली.

Loading content, please wait...