
Pune Cantonment Kirkee To Khadki
Sakal
पुणे : ब्रिटिश राजवटीत खडकी नावाचा ‘किरकी’ असा वापर सुरू झाला. स्वातंत्र्यानंतरही संरक्षण मंत्रालयाच्या कागदोपत्री ‘किरकी’ हा उल्लेख कायम राहिला. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आलेल्या एका मराठी अधिकाऱ्याने त्याची दखल घेत ‘खडकी’ हे नाव वापरण्याबाबत संरक्षण मंत्रालयास पत्रव्यवहार केला. सात ते आठ वर्षांनंतर संरक्षण मंत्रालयाने त्या पत्राची दखल घेत ‘खडकी’ हेच नाव कागदोपत्री वापरण्याचा अध्यादेश काढला. त्यामुळे २०० वर्षांनंतर पुन्हा एकदा खडकीला ‘खडकी’ हे नाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.