Pune News : २३ आराखड्यांनंतर आता पुन्हा वाहतुकीचा नवा आराखडा

पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गेल्या चार दशकांत तब्बल २३ आराखडे तयार करूनही पुणेकरांच्या वाहतुकीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही.
Pune traffic issue

Pune traffic issue

esakal

Updated on

पुणे - शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गेल्या चार दशकांत तब्बल २३ आराखडे तयार करूनही पुणेकरांच्या वाहतुकीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. सायकल मार्गांपासून उड्डाणपुलांपर्यंत, वाहनतळापासून पुणे-पिंपरी चिंचवडच्या एकत्रित वाहतूक व्यवस्थेपर्यंत आणि मेट्रोपर्यंत विविध आराखडे तयार झाले. त्यातील मेट्रो वगळता अन्य आराखडे कागदावरच राहिले आहेत. असे असताना महापालिकेने पुन्हा एकदा वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार नियुक्त केला आहे. हा सल्लागार तुकड्या तुकड्यात वाहतुकीचा विचार न करता संपूर्ण शहराचा संर्वंकष आराखडा तयार करेल असा दावा प्रशासनाने केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com