शेतकऱ्यांनो, पीक कर्ज घ्यायचंय? मग चिंता नको, आता बॅंकाच घेणार ऑनलाईन...

After applying for crop loan, the bank itself will take online satbara
After applying for crop loan, the bank itself will take online satbara

पुणे : पीक अथवा जमिन तारण ठेऊन कर्ज घेताना बॅंकांना सातबारा उतारा देण्याची गरज नाही. कर्जासाठी अर्ज केल्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून बॅंका संबंधित कर्जदाराचा ऑनलाइन सातबारा मागवून घेणार आहेत. भूमी अभिलेख विभागाने सुरू केलेल्या योजनेचा गेल्या महिन्याभरात अशा प्रकारे बॅंकांनी 32 हजार ऑनलाइन सातबारा उतारा उपलब्ध करून घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

भूमि अभिलेख विभागाने बॅंकांनासुध्दा आता ऑनलाईन सातबारा उतारा आणि फेरफार उपलब्ध करून देण्याची सुविधा दिली आहे. त्यानुसार राष्ट्रीयकृत, खासगी आणि सहकारी अशा एकूण 9 बॅंकांनी जमाबंदी आयुक्त कार्यालयाबरोबर करार केला आहे. या बॅंकांनी ऑनलाईन सुविधेचा वापर करण्यास सुरुवात केली असून मे महिन्यात 32 हजारांपेक्षा जास्त सातबारे उतारे ऑनलाईन पध्दतीने घेतले आहे. शेतजमिनीवर पीक कर्ज घेणे अथवा जमिन तारण ठेऊन कर्ज घेणे आदीं कामकाजासाठी शेतकऱ्यांना आणि बॅंकांना सातबारा उताऱ्यासाठी तलाठी कार्यालयात जावे लागणार नाही. 

अय्या खरंच, तुळशीबाग सुरू होत आहे...

भूमि अभिलेख विभागाने राज्यातील 99 टक्के सातबारा उतारे ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे सातबारा उतारे घेण्यासाठी नागारिकांना तलाठी कार्यालयात जावे लागत नाही. भूमि अभिलेख विभागाने अधिकाधिक सुविधा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून दिली आहे. पीक कर्ज तसेच शेतजमिनीवरील कर्जासाठी खातेदारांना बॅंकांकडे सातबारा उतारा द्यावा लागतो. राज्य शासनाने फेब्रुवारी महिन्यात बॅंकांबरोबर बैठक घेऊन ऑनलाईन सातबारा उतारा घेण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी जमाबंदी आयुक्त कार्यालयाशी करार करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद राज्यातील नऊ बॅंकांनी याला प्रतिसाद देत करार केले आहे. एका ऑनलाईन सातबारा उताऱ्यासाठी बॅंकांना 15 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. एक महिन्यात किती सातबारे उतारे डाऊनलोड केले त्यानुसार पुढच्या महिन्यात हे पैसे ऑनलाईन पध्दतीने जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे बॅंका जमा करत आहे. 

 पुणे : कोथरूडवरील विघ्न थोडक्यात टळले; पहाटेपर्यंत चादणी चौकात होते चिंतेचे वातावरण

''ऑनलाइन सुविधेमुळे बॅंका त्यांच्याकडे आलेल्या सातबारा उताऱ्याची पडताळणी करू शकणार आहेत. लॉकडाऊन असताना सुध्दा ऑनलाईन पध्दतीने सातबारा उतारे मिळाल्याने बॅंकांची तसेच शेतकऱ्यांची पीक कर्ज घेण्यासाठी कोणतीही गैरसोय झाली नाही. सध्या राज्यातील नऊ बॅंका ही सुविधा वापरत आहेत. येत्या दोन दिवसात आणखी तीन बॅंकांशी या संदर्भात करार करण्यात येणार आहे.''
- रामदास जगताप ( उपजिल्हाधिकारी तथा ई फेरफार प्रकल्पाचे समन्वय) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com