

After Arnab Another Cyclone Murasu May Hit Andhra Pradesh Coast on November 3 With Heavy Rain and Strong Winds Expected in Coastal Districts
sakal
‘पुणे : अर्णव चक्रीवादळापाठोपाठ आता बंगालच्या उपसागरामध्ये ‘मुरासू’ चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. हे चक्रीवादळ दोन नोव्हेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ पोहचण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे शनिवारी तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात (डिप्रेशन) रूपांतर झाले.