esakal | दरोड्यातील सूत्रधाराला चार वर्षांनंतर अटक
sakal

बोलून बातमी शोधा

दरोड्यातील सूत्रधाराला चार वर्षांनंतर अटक

खासगी विमा कंपनीच्या कार्यालयावर साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकून कार्यालयामध्ये ठेवलेली दोन कोटी रुपयांची रक्कम चोरून नेणाऱ्या मुख्य सूत्रधाराला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपी मागील चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

दरोड्यातील सूत्रधाराला चार वर्षांनंतर अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - खासगी विमा कंपनीच्या कार्यालयावर साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकून कार्यालयामध्ये ठेवलेली दोन कोटी रुपयांची रक्कम चोरून नेणाऱ्या मुख्य सूत्रधाराला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपी मागील चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

 संजय चंद्रकांत गंभीर (वय ४६, रा. रॉयल केटाले, रावेत) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी यापूर्वी ११ जणांना अटक केली आहे; परंतु गंभीर हा फरारी होता. सेनापती बापट रस्त्यावरील एका इमारतीमध्ये साईराम अय्यर यांचे लाइफ जनरल इन्शुरन्स अँड ब्रोकरेज नावाचे कार्यालय आहे. अय्यर यांना मुंबई येथे नवीन कार्यालय घ्यायचे होते. त्याच्या व्यवहारासाठी त्यांनी एक जून २०१५ रोजी त्यांच्या कार्यालयामध्ये दोन कोटी रुपयांची रक्कम आणून ठेवली होती. याबाबत त्यांचे कर्मचारी मनोज एलपूर (रा. पिंपरी) यास माहिती होती. त्याने त्याच्या मित्राच्या मदतीने दोन कोटी रुपये चोरण्याचा कट रचला. त्यानुसार, त्यांनी नऊ जून रोजी रात्री कार्यालयावर दरोडा टाकून दोन कोटी रुपयांची रक्कम चोरून नेली. या घटनेनंतर चतुःशृंगी पोलिसांनी मनोज एलपूर, चंद्रकांत बेलवटे (रा. चिंचवड), अमित सांगळे (रा. निगडी) व इतर आठ अशा ११ जणांना अटक केली होती. गंभीर हा बाणेर रस्त्यावरील सकाळनगर येथील हॉटेल चारूज येथे येणार असल्याची खबर गुन्हे शाखेच्या विशेष पथकातील पोलिस कर्मचारी महेश निंबाळकर यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलिस आयुक्‍त शिवाजी पवार यांना माहिती दिली.

अनेकांना लुटले 
संजय गंभीर याने बॅंकेने जप्त केलेल्या मालमत्ता अर्ध्या किमतीत मिळवून देतो, अशी बतावणी करून दहा जणांना दोन कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्यास अटकही करण्यात आली होती; तर २०११ मध्ये टेक महिंद्रा कंपनीमध्ये नोकरी लावून देतो, असे सांगूनही त्याने अनेकांना लुटले होते.

loading image
go to top