
Gudluck Cafe: पुणे महापालिकेच्यावतीनं फर्ग्युसन रस्त्यावरील अनधिकृत बांधकामांवर जोरदार कारवाई करण्यात आली. यावेळी प्रसिद्ध गुडलक कॅफे तसंच हॉटेल वैशाली यांनी केलेलं अतिक्रमणही महापालिकेच्यावतीनं हटवण्यात आलं. जेसीबीच्या सहाय्यानं हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं, या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.