esakal | देवाचं दर्शन घेतले, नंतर स्वतःवर वार करत तरुणाने संपवले जीवन
sakal

बोलून बातमी शोधा

हल्ला

देवाचं दर्शन घेतले, नंतर स्वतःवर वार करत तरुणाने संपवले जीवन

sakal_logo
By
सागर आव्हाड - सकाळ वृत्तसेवा

नोकरी गेल्याच्या नैराश्यातून मध्य प्रदेशमधील एका तरुणाने पुण्यात आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आत्महत्या करण्याआधी तरुणाने मंदिरात जात देवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर चाकूने वार करत स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. उपस्थितांनी त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवलं. आज, सोमवारी उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला.

नैराश्यात गेलेल्या मध्य प्रदेशमधील तरुणाने साने गुरूजी वसाहत येथील दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर स्वतःवर चाकूने वार केले. उपस्थिंतानी त्या तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राजेंद्र रमेश महाजन (वय 22, रा. पुणे, मुळ. बुर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

तरुणाजवळ असलेल्या मोबाईलवरून दत्तवाडी पोलिसांनी घटनेची माहिती नातेवाईकांना दिली. मुलाची वाट पहात असलेल्या नातेवाईकांना या घटनेनंतर धक्काच बसला. मध्य प्रदेशातून त्याचे नातेवाईकांनी पुण्याकडे रवाना झाले आहेत.

loading image
go to top