‘ॲमेनिटी स्पेस’चा विषय लांबणीवर

विरोधकांमध्ये एकमत न होऊ शकल्याने मुख्य सभा तहकूब
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal

पुणे : शहरातील १८५ ॲमेनिटी स्पेस व ८५ आरक्षणाच्या अशा २७० जगा भाड्याने देण्याच्या विषयास राष्ट्रवादी कॉंग्रेससह (ncp) शिवसेना (shivsena), काँग्रेसची (congress)भूमिका विरोधाची राहिल्याने यावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे मुख्य सभा तहकूब झाल्याने हा विषय मंजूर न होता, पुन्हा लांबणीवर पडला आहे.

राष्ट्रवादीने बुधवारी सायंकाळी महापालिकेत पत्रकार परिषद घेऊन, ॲमेनिटी स्पेसचा आराखडा करणार आणि ३३ टक्के जागा अर्बन स्पेससाठी राखीव ठेवणार, या उपसूचनांच्या बदल्यात ठरावाला पाठिंबा दिला होता. पण भाजपकडून प्रस्तावात बदल करण्याचे कोणतेही ठोस आश्‍वासन मिळाले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध करण्याचे ठरविले. त्यामुळे भाजपच्या प्रयत्नाला धक्का बसला. मुख्य सभा दुपारी तीन वाजता सुरू झाली. भाजपचे नेते कल्याणसिंह, डॉ. गेल ऑम्वेट, शरद महाजन यांचे निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करून सभेचे कामकाज तहकूब केले. त्यामुळे ॲमेनिटी स्पेसच्या विषयासह मेट्रो, ‘स्वच्छ’ला कचरा संकलनाचे काम देण्याचे विषय देखील लांबणीवर पडले. आता यावर ८ सप्टेंबर रोजी निर्णय होणार असल्याने सहमती घडविण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

Pune Municipal Corporation
डिवचण्याचा प्रयत्न केल्यास प्रत्युत्तर देऊ : शिवसेना

ॲमेनिटी स्पेसचा विषय मंजूर करण्यात येणार आहे. पुढच्या बैठकीपर्यंत कोणत्याही पक्षाने अधिकृतपणे या विषयावर बदल करण्याची मागणी केल्यास त्याचा विचार केला जाईल. राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेदांमुळे विकासकामावरून राजकारण केले जात आहे, असे आमचे मत आहे.

- गणेश बीडकर, सभागृह नेते

भाजपने हा विषय पुढे ढकलला असला तरी आमचा यास विरोध कायम असणार आहे. भाजपचा प्रस्ताव शहराच्या हिताला बाधा आणणारा आहे.

- आबा बागूल, गट नेते, काँग्रेस

पालिकेच्या जागा खासगी विकसकांना भाड्याने देण्यास आमचा पूर्वीपासून विरोध आहे. यापुढेही विरोध असेल. बहुमतावर निर्णय घेतला तर राज्य सरकारकडे तक्रार केली जाईल.

- पृथ्वीराज सुतार, गट नेते, शिवसेना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com