दहा वर्षे झोपा काढल्या! ‘ब्लू प्रिंट’कडे दुर्लक्षामुळे पुणे झाले ‘हॉटस्पॉट’

योगिराज प्रभुणे/ उमेश शेळके
Wednesday, 16 September 2020

‘पुण्यात भविष्यात साथीच्या रोगाचा उद्रेक होऊ शकतो. शहर व जिल्ह्यातील 20 टक्के लोकांना याचा संसर्ग होईल. त्यादृष्टीने उपाययोजना करून ठेवा...’, जागतिक आरोग्य संघटनेने ही सूचना करून आता दहा वर्षे होऊन गेली आहेत. मात्र, सरकार किंवा स्थानिक कारभाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने पुणेकरांवर ही वेळ ओढावली आहे.

पुणे - ‘पुण्यात भविष्यात साथीच्या रोगाचा उद्रेक होऊ शकतो. शहर व जिल्ह्यातील 20 टक्के लोकांना याचा संसर्ग होईल. त्यादृष्टीने उपाययोजना करून ठेवा...’, जागतिक आरोग्य संघटनेने ही सूचना करून आता दहा वर्षे होऊन गेली आहेत. मात्र, सरकार किंवा स्थानिक कारभाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने पुणेकरांवर ही वेळ ओढावली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संघटनेने व्यक्त केलेली भीती मार्चपासून खरी ठरली आहे. कोरोनाच्या साथीचा फटका प्रत्येक पुणेकराला बसतो आहे. मग, मधल्या दहा वर्षांत या सूचनेकडे दुर्लक्ष का झाले? यावर ‘सकाळ’ने रविवारच्या अंकात बोट ठेवले. 
जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या स्पष्ट सूचनेच्या आधारावर प्रशासनाने ‘ब्लू प्रिंट’ तयार केली. मात्र, त्याकडे पुण्याच्या कारभाऱ्यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले. तीन हजार पुणेकरांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. त्याला जबाबदार कोण, असा प्रयत्न उपस्थित होत आहे. पुण्यात स्वाइन फ्लूचा दहा वर्षांपूर्वी प्रचंड मोठा उद्रेक झाला होता. देशातील स्वाइन फ्लूचा पहिला बळी पुण्यात गेला. त्या वेळी या साथीच्या आजाराने गेल्या अकरा वर्षांमध्ये दोन हजार 987 रुग्णांचा मृत्यू झाला. 

लोकहो, आता... ‘शिस्त देवो भवः’

काय होतं ‘ब्लू प्रिंट’मध्ये? 

 • अमेरिकेच्या ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल’च्या (सीडीसी) धर्तीवर केंद्र उभारणे 
 • साथरोग नियंत्रण उपाययोजनांचा विचार 
 • बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या शोधाचे तंत्र 
 • रुग्णांच्या विलगीकरणाचे निकष 
 • सरकारी रुग्णालयांच्या खाटांची क्षमता वाढविणे 
 • खासगी रुग्णालयांची मदत घेणे 
 • मोठ्या प्रमाणात ऑक्‍सिजन बेड उपलब्ध करण्याची व्यवस्था 
 • डॉक्‍टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्वच्छता कर्मचारी यांची उपलब्धता 

यापैकी काय झाले? 

 • औंध उरोचे जिल्हा रुग्णालयात रूपांतर 
 • ससून रुग्णालयाचे अंशतः विस्तारीकरण 
 • डॉ. नायडू रुग्णालयाची नवीन इमारत 
 • खासगी रुग्णालयांची संख्या वाढली

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After ten years of sleep Pune hotspot neglect blueprint