मलकापूर कचरा डेपोच्या धुरामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर

मलकापूर कचरा डेपोच्या धुरामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर

Published on

कचरा डेपोच्या धुरामुळे आरोग्य धाेक्यात

आगाशिवनगरमधील स्थिती; नागरिकांतून उपाययोजनांची मागणी

मलकापूर, ता. १ : आगाशिवनगर येथील माळीनगर परिसरातील पालिकेच्या कचरा डेपोतून गेल्या तीन दिवसांपासून आगीमुळे धूर लाेट निघत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांचा जीव घुसमटत आहे. पालिकेकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, धुरामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन नागरिकांची जिवाची घालमेल झाली आहे.
वारंवार उद्‍भवणाऱ्या या समस्येवर लोकप्रतिनिधींकडून ठोस उपाययोजना होणार कधी? असा सवाल स्थानिकांमधून उपस्थित होत आहे. आगाशिवनगर (मलकापूर) येथील माळीनगर परिसरातील या कचरा डेपोमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. त्याला आग लागल्यानंतर ते दीर्घकाळ धुमसत राहतात. या धुराचे लोट लाहोटीनगरसह आगाशिवनगर परिसरात पसरत असून, नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
विशेष म्हणजे, या कचरा डेपोच्या शेजारीच पालिकेचे मलशुद्धीकरण केंद्र आहे. तेथे कर्मचारी नियमितपणे काम करत असतात. त्यामुळे ही आग केवळ पर्यावरणीयच नव्हे, तर मानवी आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीनेही गंभीर असल्याची स्थिती आहे.
दरम्यान, मुख्याधिकारी कपिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना केल्या. कृष्णा रुग्णालय व कऱ्हाड पालिकेच्या अग्निशमन दलाच्या सात गाड्या पाठवल्या. कार्यालयीन अधीक्षक अभिजित ढाणे यांनीही प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
कचरा व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन धोरण आखण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींनी कधी स्वीकारणार? अशी चर्चा सुरू आहे. महामार्गावरून जातानाही धुराचे लोट दिसत असल्याने वाहतूक सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, काही नागरिकांनी यासंदर्भात पालिकेकडे तक्रारी केल्या. नगराध्यक्षांसह काही नगरसेवकांनी घटनास्थळी पाहणी केली. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजनांचे निर्णय घेण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींनी कधी उचलणार? असा प्रश्न आहे.
-------------
वारंवार तक्रारी

या कचरा डेपोला यापूर्वी अनेकदा आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. आग लागली की, प्रशासनाकडून ती आटोक्यात आणली जाते. मात्र, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाही. आगीच्या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या. मात्र, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना होताना दिसत नाहीत. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. लागलेल्या आगीवर जेसीबीच्या साह्याने दुसरा कचरा आणून टाकला जात आहे.

---------
कोट
---------

आगाशिवनगर येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास कायमस्वरूपी थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेतल्या आहेत. आग पूर्णतः आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी कटिबद्ध आहे. लवकरच या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला येईल.


- कपिल जगताप,
मुख्याधिकारी, मलकापूर
--------------------


01256
आगाशिवनगर : माळीनगर कचरा डेपोला आग लागल्याने निघणारे धुराचे लोट. (राजेंद्र ननावरे ः सकाळ छायाचित्रसेवा)
------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com