मलकापूर नूतन मराठी प्रशालेमध्ये शालांतर्गत विविध स्पर्धा संपन्

मलकापूर नूतन मराठी प्रशालेमध्ये शालांतर्गत विविध स्पर्धा संपन्

Published on

आगाशिवनगरमध्ये क्रीडा स्पर्धा उत्साहात

नूतन मराठी प्रशालेत आयोजन; विजेत्यांना बक्षिसांचे वितरण

मलकापूर, ता. १८ : नूतन मराठी प्रशालेमध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सलग तीन दिवस हौसाई कन्या शाळेच्या मैदानावरती या स्पर्धा झाल्या. स्पर्धांचे उद्‌घाटन कऱ्हाड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले.
सांघिक खेळामध्ये कबड्डी, खो- खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वैयक्तिक प्रकारात धावणे, रिले, गोळाफेक तसेच काही मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. या स्पर्धा संस्थेच्या अध्यक्षा लता शिंदे व संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य आर. बी. पाटील आणि मुख्याध्यापक आनंदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाल्या.
पंच म्हणून मुख्याध्यापक आनंदा पाटील आणि अभिजित येडगे यांनी काम पाहिले. स्पर्धांचे नियोजन मानसी नायकवडी यांनी केले.
यावेळी श्री. सूर्यवंशी यांची कऱ्हाड तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार केला. हौसाई कन्या शाळेचे मुख्याध्यापक सुरेश वेदपाठक यांचे सहकार्य लाभले. त्यांचा देखील नूतन मराठी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी माध्यमिक विभागप्रमुख नलिनी पाटील व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सांघिक तसेच वैयक्तिक विजेत्या संघ आणि खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे.
--------------------------------
01218
आगाशिवनगर : येथे संदीप सूर्यवंशी यांचा सत्कार करताना आर. बी. पाटील, आनंदा पाटील आदी.
---------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com